नांदणीत आदिवासी कोळी महादेव,टोकरे, मल्हार,डोंगर,ढोर जमातीचा प्रमाणपत्र व पडताळणी संबधी कार्यशाळा संपन्न

Spread the love

नांदणीत आदिवासी कोळी महादेव,टोकरे, मल्हार,डोंगर,ढोर जमातीचा प्रमाणपत्र व पडताळणी संबधी कार्यशाळा संपन्न.

नांदणी : येथील आदिवासी कोळी जमातीच्या वतीने कोळी महादेव,कोळी टोकरे , कोळी मल्हार,कोळी डोंगर, कोळी ढोर या जमातींना अनुसूचित जमातीची प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी व पडताळणी संबंधी कार्यशाळा नांदणी ता. शिरोळ येथे संपन्न झाली.
अनुसूचित जमात प्रमाणपत्र संबंधी मार्गदर्शन अभ्यासक डॉ.मनोहर कोळी, आप्पासाहेब कोळी,महादेव व्हंकळी,आण्णासो शिरगावे,रमेश शंकर कोळी,दिलीप शिरढोणे यांनी मार्गदर्शन केले.कार्यशाळेसाठी शिरोळ तालुक्यातील जमात बांधव- भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.सदर कार्यशाळेमध्ये कोळी जमातीतील विविध पदांवर निवड झालेल्या जमात बांधव- भगिनींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये कोळी भूषण पुरस्कार प्राप्त डॉ.मनोहर कोळी, शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्था कुरुंदवाडच्या सभापतीपदी निवड झालेले अशोक देवसो कोळी यांचा सत्कार करण्यात आला.सदर कार्यशाळेसाठी ओंकार कोळी,सचिन कोडोले व जमात बांधवांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!