चिपरीच्या शिरपेचात मनाचा तुरा,राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रेम रजपूत व दिशा कोरे यांना सुवर्णपदक

Spread the love
चिपरी /प्रतिनिधी
युवकांना कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करायचे असेल तर सर्व प्रथम त्यांची स्वतःची मानसिकता इच्छाशक्ती तर असावीच लागते परंतु पाठोपाठ पालकांनीही आपला पाल्यामध्ये एखादे उत्तुंग शिखर पार करण्याची हिम्मत असेल तर त्याला त्याबाबत पालकांनीही प्रोत्साहन देणे अत्यंत महत्वाचे असते याचाच प्रत्यय शिरोळ तालुक्यातील चिपरी गावात दिसून आला.चिपरी पूर्व भाग रजपूत मळा येथील शेतकरी कुटुंबातील प्रेम अजित रजपूत याने राज्यस्थरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मुलांमध्ये ९६ किलो वजन गटात २०० किलो वजन उचलून सुवर्ण पदक प्राप्त करत त्याची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे.त्याने प्राप्त केलेल्या यशाबद्दल सर्वच थरातून त्याचे कौतुक होत आहे विशेष म्हणजे राज्याचे माजी आरोग्य राज्यमंत्री व शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रेम याच्या घरी जाऊन त्याच्या या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले.तसेच चिपरी गावातील सर्वसामान्य कुटुंबातील दिशा चंद्रकांत कोरे या मुलीने ठाणे येथे मुलींसाठी झालेल्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये ७६किलो वजनी गटात ८० किलो वजन उचलून राज्यात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक प्राप्त केल्याने राजस्थान बिकानेर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.दिशा कोरे हिचे त्यांच्या घरी जाऊन माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी अभिनंदन केले.या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या प्रशिक्षकांबरोबर कुटुंबातील सदस्यांचे मोलाचे प्रोत्साहन असलेने राष्ट्रीय स्थरावरही हे खेळाडू आपल्या पालकांबरोबर गावाचे नावही उंचावत आहेत.
error: Content is protected !!