पशुवैद्यकीय दवाखाना शिरोळ व दत्त कारखाना यांच्यावतीने लाळ खुरकूत लसीकरण मोहीम

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

थंडीच्या दिवसांमध्ये जनावरांना लाळ खुरकूत या संसर्गजन्य रोगाची लागण होत असते.त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पशुवैद्यकीय दवाखाना शिरोळ श्रेणी १ व श्री दत्त साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमानाने कारखानास्थळी आलेल्या ऊस तोड मजुरांच्या जनावरांना लाळ खुरकूत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.शिवाय ऊसतोड मजुरांना जनावरांची घ्यावयाच्या काळजीबद्दलही मार्गदर्शन केले जात आहे.शिरोळ दत्त कारखानास्थळी बीड,सांगोला, मंगळवेढा यासह अन्य जिल्ह्यातील हजारो ऊसतोड मजूर बैलगाडीने ऊस तोडीसाठी दाखल झाले आहे. थंडीच्या दिवसात जनावरांना लाळ खुरखत  रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात होते.मात्र ऊसतोड मजूर याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे इतर जनावरांनाही याची लागण होते.

शिवाय काळजी घेताना लहान बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने या आजाराची तीव्रताही वाढत जाते त्यामुळे ऊसतोड मजुरांना योग्य वेळी लसीकरण आणि योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शिरोळ पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ व श्री दत्त साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमानाने कारखानास्थळी ऊस तोड मजुरांच्या जनावरांना लाळ खुरकूत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.वैभव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल कोळी,सुदर्शन कोळी,मदतनीस शुभम जगताप,अविनाश खामकर,तानाजी कोरवी लसीकरण मोहीमेत सहभागी झाले आहेत.

error: Content is protected !!