कष्टाने कमवलेले पैसे ‘या’ बँकेत असल्याने कर्मचारी भयभीत

Spread the love

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेतील संचालक मंडळाची नेमणूक ही रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार झालेली नाही.कार्यकारी संचालक अवघ्या २२ वर्षांचे असून त्यांना कुठलाही अनुभव नाही.नियुक्तीनंतर अनेक चुकीचे निर्णय घेण्यात आले आहेत.त्यामुळे २३०० कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या या बँकेतून एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या ठेवी काढून घेण्यास सुरुवात केली आहे. अतिशय कष्टाने कमवलेले पैसे या बँकेत असल्याने कर्मचारी भयभीत झाले आहेत.त्यामुळे नियमात न बसणाऱ्या,अनुभव नसलेल्या या कार्यकारी संचालकाच्या जागी तात्काळ सरकारी कर्मचारी नेमणार का राजकीय द्वेषातून कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात आहे का? असे प्रश्न आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात मांडले.

error: Content is protected !!