श्री.छत्रपती शाळेचे केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत उज्ज्वल यश 

Spread the love
श्री.छत्रपती शाळेचे केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत उज्ज्वल यश
शिरोळ /  प्रतिनिधी चंद्रकांत भाट
धरणगुत्ती (ता शिरोळ) येथे झालेल्या दत्तनगर केंद्रांतर्गत शालेय सांस्कृतिक स्पर्धेत शिरोळ येथील श्री छत्रपती विद्या मंदिर क्रमांक ३ या शाळेने उज्वल यश संपादन केले आहे.दत्तनगर केंद्रस्तरीय शालेय सांस्कृतिक स्पर्धेत
श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी लहान गटातील समूहगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक.नाट्यीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक.समूह नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक कथाकथन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला विजेत्या
स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी सौ.भारती कोळी,विस्तार अधिकारी दीपक कामत, केंद्रप्रमुख आण्णा मुंडे मुख्याध्यापिका तेजस्विनी गायकवाड,
वर्गशिक्षिका सविता़ जाधव,अध्यापिका सुरेखा येळगुडे,जयश्री पेटकर,सुमित्रा कोळी अध्यापक यशवंत कांबळे उत्तम कोळी,वादक दीपक महानाम व सचिन
कदम शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप कोळी यांच्यासह समितीचे पदाधिकारी सदस्य पालक यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
error: Content is protected !!