कर्मचाऱ्यांचे आंदोलन,शिरोळ तालुक्यातील शासकीय कामकाजात ठप्प

Spread the love

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन,शिरोळ तालुक्यातील शासकीय कामकाजात ठप्प

शिरोळ / प्रतिनिधी

जुनी पेन्शन योजना लागू करा’ या मागणीसह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून (14 डिसेंबर) संप सुरु केला आहे. शिरोळ तालुक्यातील राज्य सरकारी कर्मचारी नूतन पंचायत समिती इमारतीच्या आवारात एकत्र येऊन घोषणाबाजी करत आपल्या आपल्या व्यथा मांडल्या. शिरोळ तालुक्यातील तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, भूमी अभिलेख कार्यालय यासह विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी शिरोळ येथील पंचायत समिती कार्यालय परिसरात जमले.पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, एकच मिशन जुनी पेन्शन’ अशा घोषणा देत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला या आंदोलनात शिरोळ तालुक्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

error: Content is protected !!