‘या’ ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात आपला हक्क संघटना आंदोलन करणार 

Spread the love
चिपरी बिगर येथे गट नं.१८० मधील राहते घर ग्रामपंचायत प्रशासनाकडून काढले

ग्रामपंचायत प्रशासन व सदस्याच्या विरोधात आपला हक्क संघटना तीव्र आंदोलन करणार

चिपरी तालुका शिरोळ येथील बिगर वसाहत चिपरी गट नंबर 180 मध्ये राहते घर अतिक्रमण आहे म्हणून जबरदस्तीने पाडून घरातील साहित्याची नासधूस करत महिलांना धक्काबुक्की करीत शिवीगाळ केले आहे. याबाबत पीडित कुटुंबातील युवराज नलावडे यांनी येथील आपला हक्क संघटनेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष राहुल कांबळे यांच्या समवेत जयसिंगपूर पोलीस ठाण्यात तसेच पंचायत समिती शिरोळ या ठिकाणी धाव घेऊन या संबंधित प्रकरणाची चौकशी होऊन येथील ग्रामपंचायतचे सरपंच,ग्रामसेवक, व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विश्वजीत कांबळे व त्यांचे बंधु विकास कांबळे यांच्यावर गुन्हा व्हावा अन्यथा 18 डिसेंबर रोजी जयसिंगपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या क्रांती चौकात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे मागणीचे निवेदन जयसिंगपूर पोलीस ठाण्यास दिले.
error: Content is protected !!