ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या फंडातून शिरटीत ४० लाखाचा निधी

Spread the love
शिरटी / प्रतिनिधी
शिरटी ता शिरोळ येथे युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या विशेष प्रयत्नातून शिरटी गावाच्या विकासासाठी नामदार गिरीश महाजन ग्राम विकास मंत्री यांच्या फंडातून ४० लाख रुपयांचे निधी मिळाले असुन पहिल्या
टप्प्यातील कनवाड रस्ता ते संपत रामोजी घर कॉंक्रिटीकरण करणे १० लाख रुपये हे काम पुर्ण करुन नागरीकांना ये जा करण्यासाठी सोईस्कर झाले आहे.दुसऱ्या टप्प्यातील काम पुर्णत्वास आले आहे.व
तिसऱ्या टप्प्यातील मंजुर काम अमोल रोजे घर ते शिरटी किसान सोसायटी पर्यंत बंदिस्त गटर्स करणे १० लाख रुपये,या कामांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉ,जे,जे,मगदुम ट्रस्टचे उपाध्यक्ष सोनाली मगदूम व
पृथ्वीराजसिंग यादव यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले.उपस्थित मान्यवर आपले मनोगत व्यक्त केले  यावेळी सोनाली मगदूम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले शिरटी गावातील ज्या समस्या असतील
त्या आम्ही सोडवू व डॉ,जे.जे.मगदूम ट्रस्टच्या वतीने ज्या नागरिकांना आरोग्याच्या ज्या काही समस्या असतील त्याही आम्ही आरोग्य शिबीराच्या माध्यमातून  पूर्ण करू असे बोलून आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी स्वागत व
प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य अभय गुरव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खोबरे यांनी केले.या कार्यक्रमास ग्रा,प, सदस्य सोनाली कोगनोळे, उपसरपंच प्रकाश माळी,अलम मुल्लाणी,विलास भोसले, सुरेश हुग्गे,
अभिनंदन सुर्यवंशी,सुभाष कुंभार,स्वप्निल पाटील,सौरभ पाटील,सागर मगदुम, रमेश कुंभार,देशभुषण बुबनाळे, अमोल रोजे, रुद्राक्ष कांबळे,गफुर मुल्लाणी, अरुण सुतार, सुभाष मगदुम, दत्तात्रय ढेकळे, धनंजय जगनाडे, संपत
रामोजी, प्रकाश औताडे,जोश ग्रुप  व भैरेश्वर फ्रेंड्स सर्कलचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
error: Content is protected !!