कोळी समाज भूषण पुरस्काराने डॉ. मनोहर कोळी सन्मानित

Spread the love
सांगली / प्रतिनिधी
महर्षि वाल्मिकी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली यांचे वतीने देण्यात येणारा २०२३ चा कोळी समाज भूषण पुरस्कार कोल्हापूर येथील कोळी जमातीचे अभ्यासक डॉ.मनोहर
दादू कोळी यांना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक – वैभव शिंदे यांचे हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.महर्षि वाल्मिकी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली मार्फत
दरवर्षी वधू – वर मेळावा आयोजित करण्यात येतो.त्याचप्रमाणे कोळी जमातींसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना कोळी समाज भूषण पुरस्कार देण्यात येतो.
यावर्षी सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ.मनोहर कोळी यांनी कोळी जमातींसाठी केलेल्या विशेष व उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.तसेच विविध
क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या, स्पर्धा परीक्षेत यशस्वी जमात बांधवांचा सत्कार करण्यात आला.त्यामध्ये एम.पी.एस.पी.मधून निवड झालेल्या एक्साईज सब
इन्स्पेक्टर अर्चना वंजारी,विनायक कोळी यांचा समावेश होता.याप्रसंगी अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉ.प्रताप कर्नाळकर यांचे आरोग्य विषयक मार्गदर्शन झाले.यावेळी प्रा.बी.एस.गुरव,एकनाथ सुर्यवंशी,श्रीकांत कोळी,प्रताप
पन्हाळकर,उल्हास पाटील, एम.आर.औरसंगे,उदय कोळी,स्वप्नील सुर्यवंशी,खंडेराव गायकवाड,विलास कोळी, सहदेव कोळी,व्ही.डी.कोळी,आर.जी.कोळी,
रमेश कोळी,शहाजी कोळी,गजानन कोळी,राजू कोळी,विजय

पाटील,अरविंद तराळ,दिलीप शिरढोणे उपस्थित होते.

error: Content is protected !!