दूध संस्थांना आनंदाची बातमी, दूध संस्था अवसायनात काढणे आदेश रद्द

Spread the love

५० लिटिरपेक्षा दूध संकलन कमी असलेल्या दूध संस्था अवसायनात काढण्याचे आदेश पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्रालयाने दिले होते,यामुळे जिल्ह्यातील ११०८ संस्थांना

सहायक निबंधकांनी नोटीस काढली होती.आज दुग्धविकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी राज्यातील बंद पडलेल्या व पोटनियमानुसार पूर्तता न करणाऱ्या दूध व पशुसंवर्धन संस्था

५०

अवसायनात काढण्याचे आदेश मुंढे यांनी दिले.तीस दिवसांत याबाबतचा खुलासा करण्याचे आदेश दिले होते.त्यामुळे दुध संस्था चालकात अस्वस्थता होती.जिल्ह्यात लंम्पीमुळे जनावरांची

संख्या कमी झाली तसेच पावसाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे दूध संकलन कमी झाले होते,अशा परिस्थितीत दूध

संस्था टिकवणे अवघड झाले असताना अवसायनात काढणे अन्यायकारक होणार आहे.त्यामुळे हा आदेश रद्द करत असल्याचे सहनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) शहाजी पाटील यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!