जिल्हा परिषद शाळांच्या प्रशासकीय कामांबाबत आढावा बैठक संपन्न

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १५३ शाळांच्या मुख्याध्यापकांची प्रशासकीय कामांबाबतची आढावा बैठक श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड येथे संपन्न

झाली.प्रथमतः प्राचार्य आर.जे.पाटील यांचे हस्ते गट शिक्षण अधिकारी भारती कोळी यांचे स्वागत करण्यात आले.प्रा.भोजे यांनी सर्वांचे स्वागत केले.प्रारंभी संजय

बापू गायकवाड यांनी ऑनलाईन कामकाजाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.गटशिक्षण अधिकारी भारती कोळी यांनी प्रशासकिय कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.

शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत यांनी शालेय पोषण आहार प्रधानमंत्री पोषणशक्ती योजना,पूरक आहार,ऑनलाईन माहिती, दैनंदिन नोंदी,परसबाग

याविषयी मार्गदर्शन केले.याप्रसंगी केंद्रप्रमुख-दत्तात्रय जाधवर,रियाजअहमद चौगले, सलीम अत्तार,सुभाष कुरुंदवाडे, यशवंत पेठे यांचेसह सर्व मुख्याध्यापक,

बी.आर.सी.तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित होते.आभार केंद्रप्रमुख अण्णा मुंडे यांनी मानले.

error: Content is protected !!