गोठ्याचा कडी कोंयडा तोडून १ लाख ४० हजार रुपये किंमतीची गाय चोरीस

Spread the love

कोथळी ता.शिरोळ येथील गावापासून काही अंतरावर असलेल्या समडोळीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील गोठ्यातून रात्री गोठ्याचा कडी कोंयडा तोडून १ लाख ४० हजार रुपये किमतीची गाभण गाय चोरीस गेल्याची घटना घडली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी शांतिनाथ भुपाल हंकारे यांचे गट नंबर २१७९ मध्ये जनावरांचा गोठा आहे.ते दररोज गोठ्यात रात्री वस्तीला जातात मात्र काल काही कारणास्तव ते वस्तीला गेले नाहीत या संधीचा फायदा

घेत चोरट्यांनी रात्री गोठ्याचे कडी कोंयडा उचकटून सुमारे १ लाख ४० हजार किमतीची चोरून नेली.दोन वर्षांपूर्वी त्यांच्या गोठ्यातील गाईची चोरी झाली होती पण गावापासून एक किलोमीटर अंतरावर गाळात गाईचे पाय अडकल्याने ती गाय

सकाळी परत मिळाल्याने होणारे आर्थिक नुकसान टळले होते.सकाळी गोठ्याकडे जनावरांची धार काढण्यासाठी हंकारे कुटुंबीय गेले असता हा चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला.या प्रकारानंतर पुन्हा एकदा शेतात जनावरे असणाऱ्या पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली असून पोलिसांनी

चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे.या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली नव्हती मात्र या चोरीची फिर्याद जयसिंगपूर पोलिसात देणार असल्याचे शांतिनाथ हंकारे यांनी सांगितले.

error: Content is protected !!