लिंगायत समाजाच्या सभागृहाला विरोध नाही,तर बौद्ध समाजाला विश्वासात न घेता पालिकेच्या भूसंपादन प्रक्रियेला विरोध – अनुप मदाळे

Spread the love

अखेर निघाला तोडगा… बौद्ध व लिंगायत समाज बांधवांची समन्वय बैठक,रविवारी सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन व पायाभरणी शुभारंभ पार पडणार

कुरुंदवाड / प्रतिनिधी सुरेश कांबळे

कुरुंदवाड येथील गट क्रमांक १२७ जागेची हद्द निश्चित मोजणी करून पालिका आणि बौद्ध समाजबांधवांच्या जागेची हद्द निश्चित झाल्यानंतर सांस्कृतिक भवनचे बांधकाम करण्यात येणार आहे.तत्पूर्वी रविवारी लिंगायत समाज बांधवांच्या सांस्कृतिक

भवनचे भूमिपूजन व पायाभरणी शुभारंभ बौद्ध समाजबांधवांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक आशिष चव्हाण यांनी दिली.
कुरुंदवाड पालिकेतर्फे गट क्रमांक १२७ मध्ये लिंगायत

समाजासाठी आयोजित सांस्कृतिक भवन दलित समाज बांधवांच्या जागेत उभारणी करत असल्याचे बौद्ध समाजबांधवांनी सांगत सांस्कृतिक भवनची भूमिपूजन व पायाभरणी शुभारंभचा कार्यक्रम रद्द करण्यात यावा अन्यथा आंदोलन छेडू अशी

भूमिका घेत निवेदन दिले होती.त्यामुळे पालिका प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता.पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मुख्याधिकारी चौहान यांनी शनिवारी समस्त बौद्ध समाज बांधव आणि लिंगायत समाज बांधवांची समन्वय बैठक

बोलावली होती.या बैठकीत सामोपचाराने चर्चा होऊन एकमताने निर्णय झाला.या समन्वयाच्या बैठकीत पालिका प्रशासनाने गट क्रमांक १२७ ची जमीन समस्त लिंगायत समाज बांधवांच्या सांस्कृतिक भवनची उभारणी करण्यात येणार आहे.या जागेची

आणि बौद्ध समाजबांधवांच्या जागेच्या हद्द निश्चितीबाबत शंका व्यक्त झाली होती. गट क्रमांक १२७ ची दोन्ही समाजाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत पुन्हा हद्द निश्चित मोजणी झाल्यानंतर सांस्कृतिक भवनच्या बांधकामाचे काम सुरू करण्याचा तोडगा

निघाला असून रविवारचा पायाभरणी कार्यक्रम बौद्धसामाज आणि लिंगायत समाज बांधव एकत्रित येऊन पार पडणार असल्याचे लिंगायत समजाचे अँड.देवराज मगदूम,बौद्ध समाजाचे सुनील कुरुंदवाडे यांनी सांगत या विषयावर पडदा टाकला.
पालिकेचे मुख्याधिकारी चौहान यांची दोन समजाची समन्वयाची

बैठक घेऊन सांस्कृतिक भवनच्या बाबतीत बौद्ध समाजाच्या भूमिकेला आणि लिंगायत समाजबांधवांच्या भूमिकेला हद्द निश्चितीची अडचण असून ती लवकरच मोजणी घेऊन मार्ग काढण्याची मध्यस्थी यशस्वी केल्याने पडदा पडला.यावेळी
माजी नगरसेवक अनुप मधाळे म्हणाले लिंगायत समाजाच्या सभागृह व कार्यक्रमाला आमचा विरोध नाही मात्र पालिका

प्रशासनाने आमच्या समाजाला विश्वासात न घेता भूसंपादनची जी प्रक्रिया केली आहे.त्यास विरोध आहे आणि यापुढेही आमची कायदेशीर लढाई सुरू राहील असे सांगितले.अक्षय आलासे,गौतम

ढाले,जय कडाळे,शशिकांत कांबळे-तोबरे,सुरेश बिंदगे,धम्मपाल ढाले,हेमंत आवटी,दीपक संजय कुरुंदवाडे महादेव आंबी,संजय कांबळे सिकंदर शारवान आदी दोन्ही समाजाचे बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!