अन्यथा अन्नत्याग करू प.पू १०८ उत्तम सागर मुनी महाराजांचा इशारा

Spread the love

खिद्रापूर जुगुळ पुलाचे काम तात्काळ पूर्ण करा अन्यथा अन्नत्याग आंदोलन करू परमपूज्य 108 उत्तम सागर मुनी महाराज यांचा इशारा

बातमीचा व्हिडिओ पहावा

खिद्रापूर / प्रतिनिधी

येत्या आठ दिवसाच्या आत खिद्रापूर जुगुळ या कर्नाटक महाराष्ट्र जोडणाऱ्या कृष्णा नदीच्या पुलावरील रस्त्याच्या कामास सुरुवात न केल्यास ग्रामस्थसह अन्न त्याग आंदोलन करण्याचा इशारा परमपूज्य 108 उत्तम सागर मुनी महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

ते म्हणाले की,कर्नाटक व महाराष्ट्र राज्याला दुवा ठरणारा हा खिद्रापूर जूगुळ पुल आहे.तात्कालीन खासदार प्रकाश हुक्कीरे यांनी २० कोटी ८५ लाख रुपये खर्चाच्या पुलास मंजूर करून घेतले.कर्नाटक हद्दीतील रस्ते व पूल तयार करण्यात आला आहे.महाराष्ट्र हद्दीतील खिद्रापूर गावाजवळील जमीन भूसंपादन

करणे गरजेचे आहे.यासाठी शासनाने ८० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.या रस्त्याचे व भराव्याचे काम कर्नाटक शासन करणार आहे.हा पूल २४७ मीटर लांब व अकरा मीटर रुंदीचा आहे पुलाचे काम पूर्ण झाले आहे.कर्नाटक हद्दीतील रस्त्याची ही कामे पूर्णत्वास आली आहेत.परंतु खिद्रापूर

हद्दीतील भराव व रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही या भागातील शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी शेतजमीन देण्यास तयार असताना देखील त्यांची रक्कम दिली नसल्याने भूसंपादन करता आले नाही.वारंवार मागणी करूनही या भागातील खासदार आमदारांनी व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहेत.

यावेळी परमपूज्य १०८ उत्तम सागर मुनी महाराज म्हणाले,महापुराच्या काळात राजापूर,राजापूर वाडी,खिद्रापूर यासह अन्य गावातील लोकांना या पुलाचा उपयोग होणार आहे तसेच कर्नाटकातील बेळगाव,कागवाड अथनी,चिकोडी शिरगुपी मिरज हा मार्ग जवळचा होणार असून पैशाची व वेळेची बचत होणार आहे.तसेच या पुलामुळे विजापूर कोल्हापूर हा राज्य मार्ग होणार आहे.

error: Content is protected !!