महामार्गावर भरधाव ट्रकची मोटरसायकला धडक,एकजण जागीच ठार

Spread the love

पुलाची शिरोली – कुबेर हंकारे

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकची मोटरसायकला धडक बसून मोटरसायकल स्वार जागीच ठार हा अपघात आज सकाळी ८ वाजण्यासुमार शिये फाटा येथे झाला असून या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे.अपघात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव सतिश पांडुरंग गावडे (वय ४७ रा वारणा कोडोली ता पन्हाळा) असे असून सतिश हा औद्योगिक वसाहतीमधील मंत्री मेटॅलिक्स कंपनीत काम करत होता.तो आज सकाळी आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच ०९ बी जी ९७०२ ने जात असताना पुणेहून बेंगलोरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच ०९ जी जी ११८८ ने शिये फाटा येथील धनराज हाॅटेल समोर धडक दिल्याने तो जागीच ठार झाला या अपघातामुळे हायवेवर काही काळ वाहतूकीची कोंडी झाली होती .

error: Content is protected !!