अब्दुललाट /प्रतिनिधी
गुरुकुल शिक्षण समूह येथे वार्षिक क्रीडा महोत्सवास सुरुवात झाली.डॉजबॉलचा आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वीकार हारगुले याच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून गावातील दत्त मंदिरातून क्रीडांगणावर आणण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये मैदानी खेळांना खूप महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी झटले पाहिजे,देशाप्रती असलेले आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे.असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक रविराज फडणीस सहाय्यक पोलिस निरीक्षक, कुरुंदवाड पोलिस ठाणे यांनी केले.गुरुकुल शिक्षण समूहाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.जिंकलास तर गर्व करु नको,हरशील कधीतरी हरलास तर खंत करु ,जिंकशील कधीतरी.या ओळीनी गुरुकुल शिक्षण समूहाचे संस्थापक गणेश नायकुडे यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले.यावेळी सातारा येथे झालेल्या विभागीय शासकीय डाॅजबाॅल स्पर्धेत आपल्या दोन्ही प्रशालेच्या मुलींनी यश संपादन केल्याने मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आले.तसेच राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेसाठी प्रशालेतील पियुष पाटील व साक्षी चव्हाण या विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस,अब्दुल लाटचे पोलिस पाटील मानसिंग भोसले,संस्थेचे संस्थापक श्री गणेश नायकुडे ,उपाध्यक्ष सौ नविता नायकुडे,मुख्याध्यापिका सौ बालिका पाटील व सौ रेवती मगदूम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पूजा महाजन यांनी केले.