पालिकेने सांस्कृतिक भवन बांधण्याचा ठराव तात्काळ रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू : बौद्ध समाज बांधव
कुरुंदवाड – प्रतिनिधी सुरेश कांबळे
कुरुंदवाड येथील बौद्ध समाजाच्या मालकीच्या गट क्रमांक 127 मधील जागेत पालिकेने सांस्कृतिक भवन बांधण्याचा ठराव केला आहे. हा दलित समाजावर अन्याय करणारा आहे.या संस्कृतीक भवन ठराव आणि उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात यावा.
अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा माजी नगरसेवक गौतम ढाले,सुनील कुरुंदवाडे नगरसेवक युवा नेते अनुप मधाळे,जय कडाळे यांनी दिला आहे.
कुरुंदवाड येथील पालिका प्रशासनातर्फे राघवेंद्र टाकीज,बायपास रस्त्यावरील जागेवर पालिकेचे संस्कृती भवन बांधण्याचे आयोजन आहे.ही जागा बौद्ध समाजाच्या मालकीची असून येथे सांस्कृतिक भवन उभारू नये अशी मागणी समस्त बौद्ध समाज बांधवांनी पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक आशिष चौहान यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले.
दरम्यान पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी चौहान यांनी निवेदन स्वीकारून याबाबतची कागदपत्रकांची पडताळणी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक ढाले म्हणाले बौद्ध-समाजाची वडिलोपार्जित (हराठी) जमीन गट क्रमांक 125 ते 128 या गटाची 33 गुंठे जागा ही मालकीची आहे.ही जागा बौद्ध समाजासाठी विकसित करण्याबाबत पालिकेचे तत्कालीन माजी नगराध्यक्ष कै.संजय खोत यांनी निधींची तरतूद केली होती.
मात्र काही कारणास्तव विकसितकरणाचे काम रखडले.या जागेची जुनी महसुली कागदपत्रके आम्ही सादर करू.आमच्या मालकीच्या जागेवर संस्कृतीक भवन उदघाटनाचा कार्यक्रम रद्द करावा असे सांगितले.
माजी नगरसेवक अनुप मधाळे म्हणाले समस्त बौद्ध समाज बांधवांच्या मालकीची गट क्रमांक 125 ते 128 या जागेपैकी 127 मध्ये पालिका सांस्कृतिक भवन बांधत आहे.भवनला किंवा कोणत्या समाजाला आमचा विरोध नाही.
शहरात अन्यत्र पालिकेच्या मालकीचे भूखंड असताना बौद्ध समाजाच्या जागेत का?पालिकेने या भवनची उभारणी करण्याचा ठराव रद्द करावा.आणि इतर जागेत उभारणी करावी अशी मागणी केली.
तत्कालीन पालिका प्रशासनाने डोळे बंद करून समाजाच्या मालकीच्या जागेवर ठराव पास केला आहे.आमचा सभागृह समाजाच्या कार्यक्रमाला विरोध नाही तर प्रशासनाने जे चुकीची केले आहे त्यास विरोध आहे शासन तप्त भावना सुनील कुरुंदवाडे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी धम्मपाल ढाले,आयुब पट्टेकरी,विलास कांबळे,विशाल मधाळे,आदित्य कांबळे स्वप्निल श्रीधर,दिपक कडाळे शाहीर आवळे,भीमराव मधाळे,दिनेश कांबळे,संजय ढाले सुरेश कांबळे आदि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.