शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी यांना दिल्ली दिसत नाही हि मोठी दुर्दैवाची गोष्ट – खा.सुप्रिया सुळे

Spread the love

महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे अतिशय अडचणीत सापडला आहे.अशावेळी शासनाने त्यांना मदतीचा हात देऊन उभा करायला हवे.परंतु सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांची कसलीही काळजी नाही असे स्पष्ट दिसते असे ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या अकाउंट वरून केलं आहे.यामध्ये म्हटले आहे की पालकमंत्रीपदाची भांडणं सोडवायला दिल्लीची वाट दिसते पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी यांना दिल्ली दिसत नाही हि मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. जेंव्हा या सरकारमधील नेत्यांची वैयक्तिक कामे असतात तेंव्हा विनाविलंब ते दिल्लीला पळतात मग शेतकऱ्यांना जेंव्हा गरज आहे तेंव्हा यांना दिल्लीचं तिकीट मिळत नाही का? महाराष्ट्र सरकारने दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत आणली पाहिजे व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे.असे खासदार सुळे यांनी म्हटलं आहे.

error: Content is protected !!