कुरुंदवाड येथे लिंगायत समाज बहुउद्देशीय हाॅलसाठी निधी

Spread the love

कुरुंदवाड /प्रतिनिधी

कुरुंदवाड येथे लिंगायत समाजासाठी गट नंबर १२७ मध्ये खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून पालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून लिंगायत समाज बहुउद्देशीय हाॅलसाठी निधी

प्राप्त झाला असून या हाॅलचा भूमिपूजन व पायाभरणी दि.१० डिसेंबर रोजी खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या सोहळ्यास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार विनय कोरे,माजी आमदार सुरेश हाळवणकर,पंचगंगा साखर कारखाण्याचे अध्यक्ष पी.एम.पाटील,दत्त साखर कारखाना अध्यक्ष गणपतराव पाटील,रजनीताई मगदूम, मुख्याधिकारी आशिष चौहान,अशोक स्वामी,राजवर्धन निंबाळकर,रविंद्र माने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. येथील हुक्कीरे हाॅस्पिटलजवळ होणाऱ्या कार्यक्रमास नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समाजाचे अध्यक्ष सदाशिव मगदूम यांनी कल्लेश्वर मंदिर येथे पत्रकार परिषदेत दिली.यावेळी अँड.देवराज मगदूम,सुरेश आवटी,चंद्रकांत मोरे,महादेव मगदूम,रामचंद्र आंबी,हेमंत आवटी,प्रभाकर तावदारे,बी.एस.पाटील आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!