सदलगा / प्रतिनिधी अण्णासाहेब कदम
चिकोडी तालुक्यातील सहकार क्षेत्रामध्ये अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या सदलगा शहरातील पूर्व भाग पि के पी एस या संस्थेची अलीकडेच पंचवार्षिक निवडणूक पार पडली, या निवडणुकीमध्ये सदलगा शहरातील बंडा तपकिरे यांची संचालक पदावर भरघोस मतांनी विजयी झाले,या निवडीबद्दल मलिकवाड गावातील गुरुदत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक व चिकोडी तालुक्यातील मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सरस्वती महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मलिकवाड येथील त्यांच्या कार्यालयात शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या संस्थेच्यावतीने जाहीर सत्कार केला.या सत्कार समारंभा प्रसंगी राजू पाटील,सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार अआण्णासाहेब कदम,मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते मोहनराव शितोळे,मलिकवाड येथील पत्रकार अमर माने,सदलगा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नेते कुमार माने,राजेंद्र पाटील,रावसाहेब कुंभार,राजू मुल्ला,शंकर पाटील,संजय वडगावे आणि निवास पाटील यांच्यासह कार्यालयातील कर्मचाऱ्यासोबत अनेक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.