शिरोळमध्ये हजरत नुरखान बादशहा चा गंधरात्र सोहळा उत्साहात

Spread the love

ऊरुसाचा आज मुख्य दिवस : विविध स्पर्धा , शर्यतीसह करमणूकीचे कार्यक्रम

शिरोळ / प्रतिनिधी

येथील श्री बुवाफन महाराज उत्सव सोहळ्यानंतर बुधवारी हजरत नूरखान बादशाह उरुसाला प्रारंभ झाला.येथील बसस्थानक नजीक असणाऱ्या हजरत नूरखान बादशहा दर्यात बुधवारी रात्री पारंपारिक मानकरी,दर्गा पुजारी व भाविक यांच्या उपस्थितीत गंधरात्र सोहळा पार पडला,दरम्यान,गुरुवारी उरूसाचा मुख्य दिवस असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे.सलग चार दिवस उत्सव व उरूस पार पाडण्यासाठी पवनपूत्र मंडळाच्या उरूस समितीने नेटके नियोजन केले आहे.
बुधवारी सायंकाळी प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणुकीने हजरत नूरखान बादशाह दर्ग्यात पारंपारिक मानकरी यांच्या वतीने मानाचा गलिफ घालण्याचा कार्यक्रम झाला, यावेळी चर्मकार समाजाचे नायकू माने,डॉ.दगडू माने,शिवाजी माने,शंकर माने यांच्यासह दर्गा पुजारी बशीर शेख(देवर्षी), माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,अजिंक्य पाटील,श्रीकांत पाटील नेताजी पाटील परवेज मिस्री,सुलतान शेख,दिलावर कुरणे,योगेश पाटील,विश्वजीत शिंदे,विनायक माने,सुदर्शन माने,सुभाष माने,सोमनाथ माने आदी उपस्थित होते.
यावेळी हजरत नुरखान बादशहा गंधरात्र सोहळ्यास पारंपारिक मानकरी,भाविक यांची उपस्थिती होती.दर्गा व प्रमुख मार्गावर दुतर्फा विद्युत रोषणाई करण्यात आली असून विविध स्टॉल धाटण्यात आले आहेत.दरम्यान,आज गुरुवारी हजरत नुरखान बादशहा च्या ऊरुसाचा मुख्य दिवस असून धार्मिक कार्यक्रमासह दिवसभर विविध स्पर्धा,शर्यती व करमणूकीच्या कार्यक्रम होत आहेत.उरुस समितीचे प्रमुख मार्गदर्शक युवा नेते पृथ्वीराज यादव,विजय आरगे यांच्यासह समिती अध्यक्ष बाळासाहेब जगदाळे,उपाध्यक्ष संतोष विटेकरी,किरण जगताप, पिराजी जयान्नावर,राहुल कोळी,संतोष घाडगे,प्रदीप हेरवाडे, लखन कुंभार,सागर कांबळे,संजय जगदाळे,संदीप कोळी, प्रताप जगदाळे,गणेश मोरे,नितीन कोळी,कुमार जयान्नावर, राजेंद्र जाधव,अवधूत कोळी यांच्यासह ऊरुस समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

error: Content is protected !!