दत्तवाडात सापडला अत्यंत विषारी पोळा जातीचा दुर्मिळ साप

Spread the love

दत्तवाड / प्रतिनिधी

दत्तवाड ता.शिरोळ येथे अत्यंत विषारी व दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या पोळा जातीचा साप अमोल कोळी यांच्या घरासमोर आढळून आला.दत्तवाड येथील सर्पमित्र संतोष पाटील यांनी अत्यंत शिताफीने पकडून वन विभागाकडे सुपुर्द केला.सर्पमित्र संतोष पाटील,सोहेल गवंडी,मोहन सुतार यांनी सर्पाबद्दलचे गैरसमज दूर करून शेकडो सर्पांना जीवदान दिलेले आहेत. त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!