शिरोळ असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स व आर्किटेक्टसच्या अध्यक्ष पदी इंजि.नितीन शेट्टी तर उपाध्यक्षपदी इंजि.सुजीत पाटील

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ शहराचा विस्तार दिवसेदिवस वाढत आहे.नागरिकांच्या गरजाही वाढत आहेत. शिरोळ शहरात अनेक तरुण इंजीनिअर तयार होत आहे.शिरोळ नगरपरिषद व ग्रामीण भागातील

ग्रामपंचायत मार्फत शासनाचा विविध योजनेतून नागरिकांना घरकुल मंजूर होत आहे.त्यांना काम करत असताना येणाऱ्या अडचणी व अनुभवी इंजिनिअर यांचे मार्गदर्शन करून कामाचा

उत्तम दर्जा देऊन नागरिकांचा त्यांच्या स्वप्नातील सूंदर घर व्हावं या उदेशाने शिरोळ व ग्रामीण भागातील इंजिनिअर यांची शिरोळ शहरात असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स व आर्किटेक्टसची स्थापना
करणेत आली असल्याचे मत नूतन अध्यक्ष इंजि.नितीन शेट्टी यांनी व्यक्त केले.

शिरोळ येथील हॉटेल द सयाजी येथे शिरोळ मधील असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स व आर्किटेक्टस असोसिअशनच्या बैठक पार पडली,या बैठकीत असोसिएशनच्या अध्यक्षपदी इंजिनिअर नितीन शेट्टी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

इंजिनिअर गजानन पाटील यांनी इंजिनिअर नितीन शेट्टी यांचे नाव सुचवले, उपाध्यक्ष पदी इंजिनिअर सुजीत पाटील यांची तर सचिव इंजि.स्वप्नील ढेरे,खजिनदार पदी इंजि.लक्ष्मण भोसले यांची निवड झाली.तर संचालक पदी.इंजि.वैभव काळे.

इंजि.विनोद मुळीक, इंजि.प्रथमेश पाटील,आर्कीटेक्ट हेमंत पंडित,नीलम जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.
आर्कीटेक्ट यावेळी नूतन अध्यक्ष नितीन शेट्टी म्हणाले की,असोसिएशनच्या माध्यातून शिरोळ शहराच्या विकासासाठी

सर्वतोपरी सहकार्य करण्याचा मानस आहे.असोसिएशनच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रातील अनुभवी तज्ञ इंजिनिअर यांना आमंत्रित करून मार्गदर्शन केले जाणार आहे.इंजिनिअर्सना काम

करताना काही अडचणी असतील तर असोसिएशनच्या माध्यमातून सोडवल्या जातील अशी ग्वाही शेट्टी यांनी दिली. यावेळी इंजिनिअर रामप्रसाद पाटील,अजय पाटील,गजानन पाटील,धनंजय मुळीक,रणजीत माने,वैभव शिंदे,गणेश

आरगे,दादासो काळे,अभिजित माळी,सुमित देसाई,नितीन पाटील,गणेश चुड्मुंगे,सचिन कोळी,मोहसीन गवंडी,सुमित शेट्टी,अजिंक्य पाटील वैभव माने,रोहित माळकर,शरद बावडेकर

आर्किटेक्ट शुभम शेट्टी,इंजि.सनी मंगसुळे,प्रवीण फडतारे,प्रमोद राजमाने,प्रीतम चौगुले सुशांत माने,सौरभ घाटगे,संकल्प निडोने, सचिन निकम व सौरभ घाटगे इंजिनिअर उपस्थित होते.

या मिटिंगसाठी श्री पद्मलक्ष्मी सिरॅमिक व कॉंट्रक्टरचे सूचित माने यांचे बहुमोल सहकार्य लाभले.शेवटी आभार उपाधाक्ष इंजिनिअर सुजीत पाटील यांनी मानले.

error: Content is protected !!