करंजगाव येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा व शुभारंभ

Spread the love

करंजगाव / प्रकाश ऐनापुरे

करंजगाव येथे ३०५४-२४१९ अंतर्गत ५५ लाख निधीच्या करंजगाव ते मोटनवाडी फाटा पर्यंत डांबरीकरण व खडीकरण करणे या ४ किमी रस्त्याचे उद्घघाटन,दलीत वस्तीतील १०

लाख रुपये निधीच्या समाज मंदिरचे भूमिपूजन,तसेच गावातील आमदार स्थानिक निधीतून १२ लाख रुपये निधीच्या सांस्कृतिक सभागृहचा लोकार्पण सोहळा चंदगड विधानसभेचे कार्यसम्राट

आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या मार्फत आमदार राजेश पाटील साहेबांचा सत्कार संपन्न झाला.यावेळी संघाच्या नूतन

व्हा.चेअरमन पदी निवड झाल्याबदल तानाजी गडकरी साहेब,संचालक पदी बाळू चौगुले साहेब,विठोबा गावडे साहेब यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी सरपंच सौ.अनिता अशोक गावडे, उपसरपंच सदानंद गुरव,माजी चेअरमन सटूपा भैरू पाटील,चेअरमन आनंद गावडे,हनुमान दूध संस्था चेअरमन शुभाष जाधव,आंबेडकर

दूध चेअरमन नारायण गावडे,जानबा जाधव,मारूती गावडे, विठल पावले,धोंडीबा गावडे,उत्तम चांदेकर,ज्ञानेश्वर मोरे,उत्तम बोकडे,नेताजी सुभेदार,सर्व ग्रा.प.सदस्य,पंचक्रोशीतील सर्व प्रमुख,ग्रामस्थ,युवक वर्ग,महिला उपस्थित होते.

error: Content is protected !!