श्रीमंत महाराणी सईबाई यांच्या समाधीस्थळाला २९.७३ कोटींचा निधी मंजूर

Spread the love

बारामती लोकसभा मतदार संघातील किल्ले राजगड पायथ्याशी पाल खु ता.वेल्हे परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या आईसाहेब श्रीमंत महाराणी सईबाई यांच्या समाधीस्थळाचा विकास करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता.याला यश आले असून शासनाने समाधीस्थळाचा विकास करण्यासाठी २९.७३ कोटींचा निधी मंजूर केला आहे.या माध्यमातून महाराणी साहेबांच्या स्मृतींचे जतन होणार आहे.याठिकाणी महाराणी सईबाईंचे भव्य स्मारक उभे राहिल हा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट द्वारे व्यक्त केला आहे

error: Content is protected !!