‘या’ रागातून कोथळी येथे दोन मोटरसायकल पेटवल्या

Spread the love

कोथळी / प्रतिनिधी

दोन महिन्यापुर्वी झालेल्या अपघातानंतर चर्चेमध्ये ठरलेले पैसे न दिलेच्या रागांतून कोथळी येथे दोन मोटरसायकल पेटवून

दिल्याची घटना रात्री घडली.यात १ लाख १५ हजार रुपयांचे

नुकसान झाले आहे.या घटनेप्रकरणी चेतन महादेव मगदुम, सम्मेद श्रेणीक पाटील-गिरगोंडा दोघे रा.कोथळी ता.शिरोळ याच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची फिर्याद अभिजित जिवधंर कुपाडे यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी,दोन महिन्यापुर्वी झालेल्या अपघातानंतर ठरलेले पैसे न दिल्याच्या रागांतून फिर्यादी अभिजित कुपाडे यांच्या घरात चेतन महादेव मगदुम,सम्मेद श्रेणीक पाटील-गिरगोंडा हे दोघे रात्री साडे अकराच्या सुमारास

येवून दारावर जोराचा धक्का दिला.तसेच घरातील लाईटस्विच कुर्‍हाडीने फोडले.व घरासमोरील दोन्ही मोटरसायकली पेटवून दिल्या.यामुळे या घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून अधिक माहिती घेतली.त्यानंतर जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!