कसनाळ परिसरातील युवकांची गडकोट मोहीम,तब्बल सात दिवसांचा प्रवास

Spread the love

कसनाळ परिसरातील युवकांची गडकोट मोहीम,
तब्बल सात दिवसांचा प्रवास : पुणे परिसरातील पवित्र स्थळांना भेट

कसनाळ व परिसरातील युवकांच्या सहभागाने श्री शिवसह्याद्री गडकोट मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली.कसनाळ येथील श्री शिवसह्याद्री गडकोट मोहीम संघटना गेली २६ वर्षे हे अखंड सेवाकार्य करत आहे.तरुणांना आपला धर्म,संस्कृती आणि परंपरा याची माहिती व्हावी, इतिहास माहिती व्हावा या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येते.यावर्षी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका परिसरातील पवित्र स्थळांना मोहिमेच्या माध्यमातून भेट देण्यात आली.प्रारंभी कसनाळ येथून मोहिमेला सुरुवात झाली.नंतर तासगाव येथील श्री गणेश दर्शन, पन्हाळा येथील निंबाळकर वाडा व राम मंदिर दर्शन,वाठार येथील नाईक निंबाळकर भुईकोट किल्ला,रांजणगाव गणपती दर्शन,भीमा कोरेगाव स्मारक दर्शन,छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ दर्शन,नारायण गड,शिवनेरी गड,भुईसपाट झालेले माळण गाव भेट,भीमाशंकर दर्शन,पुणे येथील महादजी शिंदे समाधी स्थळ दर्शन, हिंदवी स्वराज स्मारक दर्शन आदी पवित्र स्थान भेट देऊन परत कसनाळ येथे येवून गडकोट मोहिमेची सांगता करण्यात आली.
मोहिमेत प्रामुख्याने कसनाळ येथील सुनील सुतार,पिंटू सुतार,श्रीनाथ सुतार,अरूण सुतार, मधुकर सुतार,राजू कमते, दीपक नाईक,नितीन नाईक अनिल सुतार (भोज),बाळू सुतार (यळगुड),गणेश सुतार,शिवाजी सुतार,समर्थ सुतार (रांगोळी),बाबू सुतार,रवी सुतार (यरनाळ),जीवन मोरे (जंगमवाडी)आदींनी सहभाग घेतला होता.

error: Content is protected !!