‘या’ गावची महीला गावसभा प्रचंड गोंधळात !,पुन्हा सभा घेण्याची महीलांची मागणी

Spread the love

पट्टणकोडोली / प्रतिनिधी

कोल्हापुरातील पट्टणकोडोली येथील अलाटवाडी येथे देण्यात येणाऱ्या रास्त भाव धान्य दुकान मंजुरी शिफारसी बाबत घेण्यात आलेली महिला ग्रामसभा प्रचंड गोंधळात पार पडली.

शिफारस नामंजूर करण्याच्या हेतूने एका माजी उपसरपंचांनी महिला गोळा करून सभेमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप संबंधित संस्थेच्याअर्चना रविंद्र शिंदे, विमल मारुती शिंदे,मिकाक्षी सुहास

शिंदे या पदाधिकाऱ्यांनी केला असून ही ग्रामसभा बेकायदेशीर झाल्याने नवीन सभा घेण्याची मागणी केली आहे.
पट्टणकोडोली येथील अलाटवाडी मधील श्री जय श्रीराम महिला सहकारी दूध संस्था मर्यादित आलाटवाडी

या संस्थेला शासनामार्फत रास्त भाव दुकान मंजुरी मिळाले आहे.याबात शिफारस मिळण्यासाठी पट्टणकोडोली ग्रामपंचायत मार्फत महिला ग्रामसभा घेण्यात आली.या सभेमध्ये दोन्ही गटाच्यामहिला उपस्थित होत्या.

शिफारस देण्यासाठी 121 /20 असे मतदान झाले.मात्र यावेळी माजी उपसरपंच कृष्णाजी मसुरकर यांनी महिलांना एकत्रित करून ग्रामविकास अधिकारी,सरपंच,उपसरपंच व सदस्य यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करून आपल्या बाजूने ठराव मांडण्याचा प्रयत्न केला.

असल्याचा आरोप करत श्री जय श्रीराम महिला सहकारी दूध संस्था मर्यादित अलाटवाडी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.यावेळी प्रचंड गोंधळ झाल्याने ही सभा बेकायदेशीर ठरवण्यात यावी अशी मागणी ही या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

त्यामुळे या शिफारसी साठी पुन्हा एकदा ग्रामसभा घेऊन ठराव करण्यात यावा असे अर्चना रविंद्र शिंदे, विमल मारुती शिंदे,मिनाक्षी सुहास शिंदे यांनी अशी माहिती पत्रकारांना दिली

error: Content is protected !!