‘धक्कादायक’ शिरोळात हातचलाखीने सोन्याचे दागिने केले लंपास,चोरटा सीसीटीव्हीत कैद

Spread the love

शिरोळ येथील पोतदार ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानात ज्वेलर्सच्या मालक नाकातील रिंग दाखवत असताना ४० हजार रुपये किंमतीचे अंदाजे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानचेन चोरून नेल्याप्रकरणी शिरोळ पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद रुपाली प्रशांत पोतदार यांनी शिरोळ पोलिसांत दिली आहे.ही घटना दि.१ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली.अंदाजे ५० ते ५५ वय असलेला,रंगाने निमगोरा,अंगाने जाड,

अंगात निळ्या रंगाचा फुल हाथोप्याचा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट,डोक्यावर पांढऱ्या रंगाची गांधी टोपी, चष्मा घातलेला, उंची अंदाजे ५ फूट ६ इंच असे अज्ञात चोरट्याचे वर्णन असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अज्ञात चोरट्याने दागिन्यांच्या दुकानात येऊन नाकातील रिंग दाखवा असे सांगितले.यावर ज्वेलर्सच्या मालक नाकातील रिंग दाखवत असताना त्याने ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हातचलाखी करून लंपास केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास शिरोळ पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!