दत्तवाड येथे मंदिरातील देवीच्या दागिन्यांवर चोरट्यांने मारला डल्ला,चोरी सीसीटीव्ही टीव्ही कैद

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

दत्तवाड येथील महालक्ष्मी मरगुबाई मंदीरातील देवीच्या अंगावरील सोन्याचे २० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याला मुद्देमालासह कुरुंदवाड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने अवघ्या काही तासांतच जेरबंद

करण्यात यश आले आहे.भारत प्रभाकर काळे (वय ५५ रा.कबनूर,घुगरे मळा, इंचलकरंजी) असे संशयित आरोपीचे नाव आहे.याबाबतची फिर्याद शुक्रवारी दुपारी मंदीराचा पुजारी रामचंद्र बापू नाईक यांनी येथील पोलिसांत दिली आहे.

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार दत्तवाड येथे महालक्ष्मी मरगुबाई मंदिर आहे. मंदिरातील देवीच्या गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र होते.सकाळी मंदीराचा पुजारी नाईक यानी मंदिर उघडताच देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याचे आढळून आले.

त्यामुळे त्यानी येथील पोलिसांत चोरीची फिर्याद दिली होती.पोलिसांनी मंदीरातील सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने अवघ्या काहीतासतच चोरट्याला अटक करुन चोरीचा छडा लावण्यात यश आले.

अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल ज्ञानदेव सानप करीत आहेत.

error: Content is protected !!