बापूसो जाधव व शेवंता जाधव यांचे निधन,कनवाड गावात हळहळ व्यक्त

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

कनवाड (ता. शिरोळ) येथील बापूसो नाना जाधव(वय ९४) यांचे सहा दिवसांपूर्वी आकस्मिक निधन झाले होते.त्यांच्या पाठोपाठ पत्नी शेवंता बापूसो जाधव (वय ८५) यांचेही गुरुवारी (ता.३०)पती निधनाच्या धक्क्याने निधन झाले.

यामुळे कनवाड गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.बापूसो जाधव हे ए.के.बुखारी जयभारत सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली,सुना, नातवंडे असा परिवार आहे.

दादासो जाधव व उत्तम जाधव यांचे ते वडील होत.रक्षाविसर्जन शनिवारी (ता.२)रोजी सकाळी नऊ वाजता कनवाड येथे होणार आहे.

error: Content is protected !!