पै.शिवराज राक्षे यांने घेतली शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट

Spread the love

सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पदक विजेता शिवराज राक्षे यांने जेष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

दुखापतीवर मात करून यंदाचा महाराष्ट्र केसरीचा खिताब मिळवणारा शिवराज यांना लहानपणापासूनच आजोबा आणि वडील या दोघांकडून पैलवान होण्याचा वारसा मिळाला. अतिशय गरीब शेतकरी अशा कुटूंबातून शिवराजने आपल्या मेहनतीवर हा सन्मान मिळवला.

त्यांची वाटचाल पाहाता ते भविष्यात महाराष्ट्राचा झेंडा देशात आणि देशाची शान जगभरात उंचावतील यात शंकाच नाही.पुढील वाटचालींना शुभेच्छा देण्यासाठी शिवराज राक्षे यांचा पवार यांच्या निवासस्थानी छोटेखानी सत्कार करण्यात आला.

यावेळी, अर्जुन पुरस्कार प्राप्त, वस्ताद श्री.काकासाहेब पवार, वस्ताद श्री. गणेश मोहळ आणि श्री. प्रशांत पाटील हे उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!