‘हा’ दुर्मिळ योगायोग पाहण्यासाठी या मंदिरात मोठी गर्दी

Spread the love

खिद्रापूर येथील प्राचिन कोपेश्वर मंदिरात त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त रात्री दीपोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी मंदिराच्या स्वर्गमंडपाच्या बरोबर मध्यभागी चंद्र आला होता.या शितल चंद्रप्रकाशाने मंदिराचा परिसर उजळून निघाला होता.

कोपेश्वर मंदिरात यथायोग्य विधीवत पूजा केली.त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव आणि त्रिपुरा प्रज्वलन तसेच महाआरती करण्यात आली. कोपेश्वर मंदिराचा परिसर 3 हजार 121 दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. मंदिरात आकर्षक रांगोळ्या काढून त्याभोवती दिवे लावण्यात आले होते.

रात्री 11 वाजून 25 मिनिटांनी स्वर्गमंडपाच्या मधोमध असणाऱ्या वर्तुळाकार झरोक्याच्या बरोबर खाली जमिनीवर अगदी त्याच आकाराचा वर्तुळाकार दगड आहे. त्याला चंद्रशीला असे म्हंटले जाते.मंदिराच्या स्वर्गमंडपाच्या वर्तुळाकार झरोक्यामधून जमिनीवर चंद्रशिलेवर वर्तुळाकार कवडसा पडला होता.

हा चंद्रप्रकाशाचा वर्तुळाकार कवडसा,जमिनीवरच्या चंद्रशीलेच्या दगडाशी जुळून आला होता.हा वर्षातून एकदा येणारा दुर्मिळ योगायोग पाहण्यासाठी महाराष्ट्र,कर्नाटक व गोवा राज्यातील पर्यटक आणि भक्त यांच्यासह श्री कोप्पेश्वर मंदिराचे अभ्यासक श्रीहरी कोळी,ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!