आ.रोहित पवार यांनी ट्विट केलेल्या फोटोला मिळाल्या ‘या’ प्रतिक्रिया

आजच्या टॉवरच्या जमान्यात ग्रामीण भागात अजूनही ‘वाडा संस्कृती’ जीवंत आहे.वाडा म्हटलं की भारदास्तपणा आणि वैभव आपोआप डोळ्यापुढं येतं.युवा संघर्ष यात्रेदरम्यान सरुळ (ता.बाभुळगांव,जि.यवतमाळ) गावात दिसलेल्या अशाच वाड्यात घेतलेला फोटो आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला आहे. त्यांच्या या ट्विटला अनेक नेटकरांनी विविध प्रकारे आपल्या शैलीतून मते दिले आहेत,एका ट्विटर ने म्हटले आहे की,टॉवर जमाना शहरात आहे,तुम्ही गावाकडे नवीनच गेला असतील ना? तीही संघर्ष करायची वेळ आली,म्हणून नाहीतर तुम्हीही टॉवरमध्येच बसला असता,संघर्ष यात्रा म्हणजे नेमका कोणता संघर्ष करावा लागतो सत्ता गेली त्याचा संघर्ष की आणखी काही यासह अनेक ट्विट केलं आहे.

Spread the love
error: Content is protected !!