पेठ वडगाव / विनोद शिंगे
पेठ वडगांव शहर हे ३२ खेडयांची मुख्य बाजारपेठ असलेने व शाळा, कॉलेजीस्, राष्ट्रीयकृत बँका असलेने त्यातच टॅक्टर ऊस वाहतुक चालू झालेने शहरातील रहदारीत भरपूर वाढ झालेली आहे.तसेच वडगांव शहरातून राष्ट्रीय महामार्गाकडे जाणे येणेसाठी दोन अरुंद रस्ते आहेत.या मार्गावर हजारो वाहनांची सतत रहदारी वडगांव शहरातून होत आहे.पण काही महिनेपासून एकेरी वाहतुकीचा बोजवारा उडालेचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे कायम ट्रॅफिक जाम होत असलेने वाहनधारकांना व शहरवासीयांना याचा अतोनात अंमलदार त्रास होत आहे.तसेच शहरातील मुख्य चौका चौकात फेरीवाले, रस्त्यावरील फळ विक्रेते,भाजी विक्रेते वाहतुकीस अडथळे निर्माण करीत असलेचे दिसते.तसेच शहरातील प्रमुख मार्गावर व चौकात खडयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.वडगांव पोलीस प्रशासन व वडगांव नगरपालिका प्रशासन याबाबत कोणतीही कार्यवाही अथवा फेरीवाल्यांचे नियोजन व वाहतुकीचे नियोजन लावत नसलेचे दिसून येत आहे.तरी वडगांव पोलीस प्रशासन व पालिका प्रशासन यांनी समन्वय राखत एकेरी वाहतुक सुरु करुन व शहरातंर्गत मुख्य चौका चौकात वाहतुकीस अडथळा करणा-यावर कारवाई करावी व वडगाव शहर खड्डेमुक्त करावे.अन्यथा भाजप च्या वतीने पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन विरोधात तिव्र आंदोलन छेडले जाईल.पोलिसांना हातकणंगले तालुका भाजपच्या वतीने देण्यात आलेला आहे.यावेळी तय्यक कुरेशी तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील,आप्पा माने तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.