कनवाड / प्रतिनिधी
कनवाड येथील गट नंबर ४४२ मधील महंमदअफजल उस्मानगणी बुजरूक यांच्या गव्हाच्या पिकावर अज्ञात व्यक्तीने कीटकनाशक फवारल्यामुळे शेतातील १० गुंठ्याचे पीक जळून खाक झाले आहे.या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून,त्यांनी संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.महंमदअफजल बुजरूक यांचे गहू पीक अत्यंत उत्तम प्रकारे आले होते.मात्र,अज्ञात व्यक्तीने त्याच्या शेतातील गहू पिकावर कीटकनाशक फवारल्यामुळे सर्व पिके खराब झाली आहेत.या घटनेची माहिती मिळताच तलाठी,कृषी अधिकारी व पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.महंमदअफजल बुजरूक यांनी या घटनेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.त्यांनी सांगितले की, ‘अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊन शेती खराब आणि बी बियाणे संपूर्ण कष्ट वाया जाते.त्यामुळे संबंधित आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.शेतकऱ्यांना अशी संकटे टाकणाऱ्यांना शिक्षा देण्याची आवश्यकता असल्याचे बुजरूक यांनी नमूद केले.या प्रकरणी शिरोळ पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून,अज्ञाताचा शोध घेतला जात आहे.शेतकऱ्यांच्या नुकसान करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.