श्री हनुमानाचे सगळ्यात शक्तिशाली रूप हा पंचमुखी हनुमान आहे.हा उतार त्यांनी भगवान श्रीरामाची रक्षा करण्यासाठी घेतला होता.युद्धात जेंव्हा रावण श्री रामाना हरवू शकत नव्हते,तेव्हा त्यांनी पातळ लोकात असलेल्या त्याच्या भावाला म्हणजेच अहिरावणला मदतीला बोलावले.अहिरावणाने त्याच्या मायावी शक्तीचा वापर करून श्रीरामाच्या सैन्याला झोपून टाकले.आणि श्री राम व लक्ष्मण यांचे अपहरण करून पाताळ लोकात घेऊन गेला.ही गोष्ट कळाल्यावर जेंव्हा श्री हनुमान यांना कळली तेंव्हा हनुमान सुद्धा गेले.अहिरावण याचा जीव पाच दिव्यात होता. आणि हे पाच दिवे पाच वेगवेगळ्या दिशेत
ठेवलेल्या पाच दिव्यांना जो एक सोबत वीजवेल तेव्हाच त्याचा मृत्यू होऊ शकेल,श्री हनुमानानी खूप प्रयत्न केले,पण हे कार्य खूप कठीण होते.त्यावेळी त्यांनी डोळे मिटून श्रीरामाचे नामस्मरण करायला सुरुवात केली. श्रीरामाचे नाव घेतात हनुमानाच्या पाच दिशांना पाच मस्त निघून आली आणि हनुमानाने पाच दिशांना ठेवलेल्या पाच दिव्यांना एक सोबत विझवून अहिरावणचा वध केला आणि भगवान श्री राम व लक्ष्मण यांची सुटका केली.