आपल्या पुंडलिकासारखेच एक महान भक्त होऊन गेलेत ज्यांचं नाव होतं धन्ना जाट,लहानपणीचे सत्संग ऐकायला बसले होते तेव्हा गुरु म्हणाले तू कृष्ण देवाला नैवेद्य दाखवण्याआधी जेवतो तू पापी आहे.सत्संग संपल्यावर धन्ना गुरूंजवळ गेले व म्हणाले आमच्या घरी ठाकूरजी नाहीये.तुम्ही तुमच्या ठाकुरजी मला द्या.आता लहान बाळाला ठाकुर जी कसे देणार म्हणून त्यांनी भांग वाटण्याचा दगड त्याला दिला.त्या बाळाला वाटले तो दगड खरोखर श्रीकृष्ण आहे.म्हणून त्या दगडा समोर तो रोज बाजरीची भाकरी व भाजी ठेवायचे,तीन दिवस झाले,पण देव काय भाकरी खात नव्हता म्हणून हा पण तीन दिवसांपासून उपाशी होता.शेवटी तो देवाला म्हणाला जोपर्यंत तू भाकरी खात नाही, तो पर्यत मी जेवणार नाही,भले ही माझा जीव गेला तरी चालेल, त्याची प्रेमळ भक्ती पाहून देवाला राहवलं नाही.अचानक एक चमत्कार झाला.त्या दगडातून स्वतः भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले व त्यांनी अर्धी भाकरी धन्नाला देऊन अर्धी भाकरी स्वतः खाल्ली ते म्हणतात ना प्रेम आणि विश्वासाने हाक मारली तर देव सुद्धा धावून येतो…