कुरुंदवाड / प्रतिनिधी
परभणी येथे संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी यांना अमानुष मारहाण करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संविधानाला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात कुरुंदवाड शहरामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवार 17 तारखेला कुरुंदवाड शहर पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान धम्मपाल ढाले,सुरज शिंगे आंबेडकरवादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना बंद बाबतचे निवेदन दिले आहे.
बोलताना ढाले म्हणाले सोमनाथ सूर्यवंशी हे संविधानाच्या मूल्यांसाठी कायम उभे राहणारे कार्यकर्ते होते.त्यांना मारहाण झाल्याने त्यांचा पोलीस ठाण्यात दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेमुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.न्यायाची मागणी व दोषींवर कठोर कारवाई व्हावी,यासाठी कुरुंदवाड शहरातील व्यापारी, सामाजिक संघटना व नागरिकांनी एकत्र येत शहर बंदचे आवाहन केले आहे.शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.संबंधित घटनेतील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.