बोरीवडे पोलिस पाटीलने लाच मागितल्याच्या तक्रारीवर लाच लुचपतची कारवाई

कोल्हापूर / प्रतिनिधी

बोरीवडे गावचे पोलिस पाटील व कोडोली पोलीस स्टेशन येथील पोलिस अंमलदार यांनी तक्रारदार कडून लाच मागितल्याची घटना समोर आली आहे.बोरीवडे पोलिस पाटील भरत शंकर सूर्यवंशी व कोडोली पोलिस ठाण्यातील पोलिसांनी तक्रारदार यांना दारू विक्री संदर्भात धमकावून ५,००० रुपये लाच मागितली होती.
तक्रारदार यांना पोलिसांनी सांगितले की,तुझ्यावर दारू विक्रीबद्दल तक्रार अर्ज आला असून,ती मिटवण्यासाठी व दारू विक्री करायची असेल तर त्यांना पैसे द्यावे लागतील.त्यानंतर तक्रारदार यांनी लाच लुचपत विभाग कोल्हापूर येथे तक्रार दिली.या तक्रारीच्या पडताळणीमध्ये पोलिस पाटील सूर्यवंशी यांनी ५,००० रुपयांची लाच मागितली असून,नंतर ३,००० रुपयांची तडजोड केली होती.यावरून लाच लुचपत विभागाने कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सदर कारवाई लाच लुचपत विभागचे पोलीस उपआयुक्त शिरीष सरदेशपांडे,अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी, पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली आहे.लाच संबंधी कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी लाच लुचपत विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांनी केले आहे.
Spread the love
error: Content is protected !!