शिरोळ / प्रतिनिधी
परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातातील संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली.या घटनेचा निषेध करत दोषीवर कडक कारवाई करावी यासाठी शिरोळ तालुका राष्ट्रीय कॉग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार ) , शिवसेना (उद्धव ठाकरे)व मित्र पक्ष महाविकास आघाडीच्या वतीने शिरोळचे नायब तहसिलदार अशोक भिसे यांना निवेदन देण्यात आले. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील विविध धर्म,जाती,पत व प्रांत यांना एकत्र राष्ट्र म्हणून बाधून ठेवण्याचे महत्वपूर्ण काम भारतीय संविधानाने केले आहे.भारतीय संविधानामुळेच आपल्या देशात समता,एकता व मानवता नांदत आहे.संविधानाच्या या यशामुळेच जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाकडे गौरवाने पाहिले जाते.संविधानाचे जनक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची प्रतिकृती परभणी येथे साकारण्यात आली होती.या प्रतिमेचे मंगळवार दि.१० रोजी विटंबना करण्यात आली सदरची घटना संतापजनक व निदणीय आहे. डॉ.बाबासाहेब आआंबेडकर आणि संविधानाच्या प्रतिमेचा अपमान करणेची हिंमत होतेच कशी? या घटनेचा आम्ही भारतीय म्हणून जाहीर निषेध करत आहेत.तसेच या घटनेतील दोषीवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.जेणेकरुन भविष्यात अशा घटना आपल्या देशात घडणार नाहीत.असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.जयसिंगपूरचे माजी नगरसेवक सर्जेराव पवार आंबेडकरी चळवळीचे नेते,रमेश शिंदे,दिगंबर सकट यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी जयसिंगपूरचे माजी नगरसेवक अशोकराव कोळेकर, चंद्रकांत जाधव,गुंडाप्पा पवार,दिलीप पाटील,शामराव कदम,दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील,दरगू गावडे,
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते .