कुरुंदवाड / प्रतिनिधी
कुरुंदवाड पोलिसांनी गोवा बनावटीच्या अवैध दारुच्या वाहतुकीविरोधात मोठी कारवाई केली असून,एक पिकअप गाडी व गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे.ही कारवाई आज सोमवार १६ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बोरगाव ते पाचमैल मार्गावर करण्यात आली.गोपनीय बातमीदाराकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार,एक पांढऱ्या रंगाची टाटा पिकअप गाडी (नं.MH-09-GJ-1054) बोरगावच्या दिशेने गोवा बनावटीची दारु सोलापूरच्या दिशेने विक्री करण्यासाठी वाहतूक करत होती.या गोपनीय माहितीच्या आधारे कुरुंदवाड पोलिसांच्या सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले.पोलिसांनी सदर गाडी ताब्यात घेऊन तपासणीदरम्यान पिकअप गाडीत गोवा बनावटीच्या १२० बॉक्समध्ये ५०४,०००/ हजार रुपयांची दारु सापडली.या दारुची तस्करी सोलापूरकडे करण्याचा आरोपीचा हेतू होता.त्याचबरोबर,पोलिसांनी दारुच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची टाटा पिकप गाडीही जप्त केली.एकूण 10 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपीचे नाव रामा बाळा लोकरे (वय 36 रा.ग्यामखाना ग्राउंड, सावंतवाडी,ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग) आहे.त्याच्यावर अवैध दारु वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पवार करीत आहेत.सदरची कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस,पोलिस उपनिरीक्षक सागर पवार,पोलिस हवलदार बाळासो कोळी,पोलिस नाईक संतोष साबळे,पोलिस अंमलदार पोपट ऐवळे,नितीन साबळे,सागर खाडे,सचिन पुजारी व सायबर पोलिस ठाण्याचे रविंद्र पाटील यांच्या पथकाने केली.