केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत केंद्रिय शाळा हसूरचे घवघवीत यश

दत्तवाड / प्रतिनिधी

शिरटी येथे संपन्न झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत केंद्रिय शाळा हसूर ता.शिरोळ शाळेने घवघवीत यश संपादन केले.लहान गटात मुले व मुली यांनी खोखो व कबड्डी प्रथम क्रमांक मिळविला.मोठा गट मुले -मुली खो-खो प्रथम क्रमांक,कबड्डी व्दितीय क्रमांक,
रिले – १००x४ मी.मुले प्रथम क्रमांक,मुली – व्दितीय क्रमांक लहान गट – ५० मी धावणे -प्रज्वल नरगच्चे प्रथम क्रमांक, १०० मी धावणे -कु.आराध्या कांबळे प्रथम क्रमांक,धावणे मोठा गट -१०० मी.व २०० मी.
चैतन्य कोळी प्रथम क्रमांक, २०० मी.व ६०० मी. धावणे –
कु.सृष्टी बिरनाळे प्रथम क्रमांक, लांब उडी मोठा गट -संस्कार पाटील प्रथम क्रमांक,लांबउडी लहान गट -अफान बारगीर प्रथम क्रमांक,उंच उडी -लहान गट -प्रज्वल नरगच्चे प्रथम क्रमांक,गोळा फेक -महमद अर्श इनामदार -प्रथम क्रमांक,समर्थ सुतार -व्दितीय क्रमांक,कु.अबोली पाटील प्रथम क्रमांक,कु.स्वराली जाधव व्दितीय क्रमांक,थाळी फेक प्रकारात समर्थ सुतार -प्रथम क्रमाक,महमद अर्श इनामदार – व्दितीय क्रमांक,प्रश्नमंजुषा मोठा गट प्रथम क्रमांक,समूहगीत मोठा गट प्रथम क्रमांक,समूहनृत्य मोठा गट – व्दितीय क्रमांक पटकाविले,गट शिक्षण अधिकारी सौ.भारती कोळी,शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत,केंद्रप्रमुख आण्णा मुंडे यांचे मार्गदर्शन लाभले तर सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य,मुख्याध्यापक,अध्यापक, अध्यापिका व पालक यांचे सहकार्य लाभले.

Spread the love
error: Content is protected !!