शिरोळ / प्रतिनिधी
मागील गाळप झालेल्या उसाला २०० रुपये यावर्षी गाळपास येणाऱ्या उसाला ३७०० रुपये दर द्यावा यासह विविध मागणीसाठी शिरोळ तहसील कार्यालयासमोर आंदोलन अंकुशच्या वतीने आजपासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे.मागील गाळप केलेल्या उसाला २०० रुपये आणि चालूला पहिली उचल ३७०० रुपये द्यावेत. क्रमपाळी सार्वजनिक करून त्यानुसार भागातील ऊस प्राधान्याने तोडावा. जानेवारीअखेर लावण आणि फेब्रुवारीअखेर खोडवा ऊसतोड व्हावी असा गाववाईज प्रोग्राम तयार करून त्यानुसार ऊसतोड करावी.इंट्री खुशालीबाबत परिपत्रक काढून सर्व मुकादम वाहनधारक आणि मशीन मालक यांना नोटीस लागू करावी.या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन अंकुशच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलन शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर आज सोमवार दिनांक १६ डिसेंबर पासून सुरू करण्यात आले आहे.आंदोलनात आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे,संभाजी शिंदे,अमोल माने,आनंद भातमारे, पोपट संकपाळ,देवेंद्र चौगुले, डॉ. शिवाजी पाटील,भूषण गंगावणे, श्रीधर शेट्टी,संभाजी माने,उद्धव मगदूम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.