अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याचे आयोजन
शिरोळ / प्रतिनिधी
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून येत्या २० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता बळीराजा सिमेंट पाईप या ठिकाणी पालखीचे आगमन होणार आहे.सकाळी ९ वाजता नाम अमृतपान, सोहळा संतपूजा तसेच भजन प्रसाद यासारखे अन्य धार्मिक कार्यक्रम होणार आहे. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांची पालखी सोहळ्याचे हे २७ वर्ष आहे.तात्कालीन जि.प.चे माजी निवृत्त सनधी अधिकारी ह.भ.प.इंद्रजीत देशमुख यांनी १९९४ साली शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली.त्यावेळी त्यांनी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची महती शिरोळ व तालुक्याला करून दिली.तेव्हापासून हजारो स्वामीभक्त निर्माण झाले.अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. गेली 27 वर्षे झाली अखंडपणे सुरू आहे. समस्त शिरोळकर, स्वामी सत्संग मंडळ व वारकरी संप्रदाय यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन केले जाते.पालखी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबर महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे.गेली २७ वर्षे झाली हा सोहळा अखंड सुरू आहे.येत्या २०डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता नामस्मरण,भजन सेवा,अन्नपूर्णा पूजन, श्री ची महाआरती,झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. श्रींची पालखी मौजे आगर कडे रवाना होणार आहे. ज्या स्वामी भक्तांना धान्य, वस्तू ,द्रव्य देऊन स्वामी सेवा करायची इच्छा असेल त्यांनी चंद्रकांत महात्मे, दिलीप माने, धनाजी आरगे, उत्तम पाटील, वसंत चुडमुंगे, सुरज काळे, रवींद्र महात्मे, संतोष बनन ,मोहन पुजारी, मानसिंग पाटील यांच्याशी संपर्क साधावा.तसेच दर्शनाबरोबर महाप्रसादा घेण्याचे आवाहन संयोजकांच्या तर्फे करण्यात आले आहे.