जयसिंगपूर / प्रतिनिधी
राजपूत समाजाचे खंबीर नेतृत्व राज्याचे विद्यमान मंत्री व सिंदखेडा मतदार संघांचे आमदार मा नामदार जयकुमारजी रावल यांच्या उपस्थितीत तसेच विशेष मार्गदर्शक सूचनेनुसार भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथे आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्य विलास रजपूत यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.आम आदमी पार्टीच्या स्थापने वेळी मुंबई मधील अरविंद केजारीवाल यांचे मित्र श्री मयंक गांधी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगली सातारा व कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून संस्थापक सदस्य म्हणून विलास रजपूत यांची एकमेव निवड केली होती मात्र राजपूत समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावणे तसेच आम आदमी पार्टीची मुळ ध्येय धोरणे बाजूला ठेऊन ज्या कारणासाठी पार्टीची स्थापना झाली त्यानुसार नियम बनवण्यात आले त्या सर्वांची पायमल्ली करत चालू असलेली सध्याची वाटचाल तसेच महाराष्ट्र राज्यात तरी कोणतेच व्हिजन योग्य नेतृत्व नसल्यामुळे सुरु असलेल्या मनमानी धोरणामुळे आम आदमी पार्टी मधून बाहेर पडून भाजप मध्ये प्रवेश केला.विलास रजपूत यांच्या आई श्रीमती लीलावती रजपूत या राजकारणात सक्रिय होत्या.त्यानी ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच तालुका स्तरावरील विविध समित्यांचे सदस्य पदही भूषविले आहे.त्या काळात विलास रजपूत हे सतत त्यांच्या आई लीलावती रजपूत यांच्या सोबत असायचे त्यामुळे त्यांना शिरोळ तालुका तसेच जिल्ह्यातील राजकीय सामाजिक प्रशासकीय अनुभव आहे.आता विलास रजपूत यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.त्यांच्या अनुभवचा उपयोग करून शिरोळ तालुक्यातील भाजपा पदाधिकारी तालुक्यात भाजप पक्ष वाढीसाठी किती आणि कशा प्रकारे करून घेतात हे पहावे लागेल.