धम्माचा सन्मान आणि आचरण करणारा धम्म दर होय – पूज्य भदंत करुणानंद स्थविर

जयसिंगपूर / प्रतिनिधी

धम्माचा सन्मान आणि आचरण करणारा धम्म दर होय. तुमच्या धम्माचा सन्मान करताना दुसऱ्या धम्माचा अपमान करू नका असा उपदेश पूज्य भदंत करुणानंद स्थविर यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ आयोजित ३४ व्या बौद्ध धम्म महापरिषदेत ते बोलत होते.अध्यक्षस्थानी पूज्य भदंत उपगुप्तजी महस्थाविर होते.भंते करुणानंद बोलताना पुढे म्हणाले,आदर्श बौद्ध समाज विहारातूनच तयार होईल, धम्माच्या आचरणाने धम्म जिवंत राहणार आहे. समाजाच्या जगृतीसाठी विचार जिवंत ठेवण्यासाठी वेळ, पैसा, बुद्धिमत्ता खर्च करा.अध्यक्षस्थानावरून बोलताना पूज्य भदंत उपगुप्तजी महस्थाविर म्हणाले, तुम्ही सर्वजण जागृत आहात. हा त्यागाचा,शीलाचा दानाचा धम्म आहे. त्यागाशिवाय काहीही शक्य नाही. जिथं चारित्र्य ,आचरण, सदाचार, शील पावित्र्य आहे तिथे यश आहे. भारतासारखा महान देश जगात नाही. पण तो अंधश्रद्धा कर्मकांडाने मागे पडला. त्यामुळे इतिहासात नोंद होईल असे काम करा.पूज्य भदंत प्रज्ञाशील महस्थविर, डॉ. यशकाश्यपायन महास्थविर,भिक्षणी बुद्धकन्याजी, परमपूज्य भिक्षूनी धम्मचारिणी यांची धम्मदेसना झाली. प्रारंभी सकाळी शिरोळ पंचायत समिती समोर धम्मज्योत प्रचलित करून धम्म महापरिषदेस सुरुवात झाली. सकाळी धम्म ज्योतीचे स्वागत,धम्म ध्वजारोहण बोधिवृक्षवंदना झाली.दुपारच्या सत्रात पूज्य भदंत सत्यपालजी महास्थाविर यांच्या हस्ते धम्मप्रचलित व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून परिषदेचे उद्घाटन झाले. रमाई उपासिका संघाने भिखु संघाचे स्वागत केले. बौद्ध धम्म परिषदेतील ठरावाचे वाचन डॉ. प्रवीण चंदनशिवे यांनी केले. आभार प्रदर्शन सचिव रमेश कांबळे यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष डॉक्टर धनंजय कर्णिक यांनी केले. या परिषदेचा दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, रविकांत तुपकर,सी.आर.सांगलीकर, यांनी भेट दिली.या बौद्ध धम्म महापरिषदेसाठी हजारो बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या.

Spread the love
error: Content is protected !!