हेरले येथे चारचाकी व मोटरसायकल धडकेत एकाचा मृत्यू

हातकणंगले / प्रतिनिधी 

हेरले अपघात एक ठार – सांगलीहून आदमापूर इथं देवदर्शनाला जाणाऱ्या तवेरा गाडीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने मोटरसायकल वरील पाठीमागे बसलेले साठ वर्षीय महंमद धोंडीबा खतिब हे जागीच ठार झाले तर 65 वर्षीय राजाराम दत्तू माने हे जखमी झाले. हा अपघात रविवारी सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान कोल्हापूर सांगली महामार्गावर हेरले इथल्या गावभाग फाट्यावरील हृदया हॉस्पिटल समोर घडला. अपघातातील मयत आणि जखमी हे हेरले गावचे रहिवासी होते.

हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या राजाराम दत्तू माने हे आपल्या हिरो होंडा मोटरसायकल क्रमांक mh 09 DN 7226 वरून कोल्हापूर सांगली महामार्गावरून हेरले माळभाग फाट्यावरुन हेरले गाव बायपास रोडला घरी निघाले होते.दरम्यान सांगलीहून तवेरा क्रमांक mh 08 – 6850 मधून महिला भाविकांना घेऊन चालक प्रसाद बाळासो पाटील हा आदमापूरला देव दर्शनासाठी निघाला होता.मोटर सायकल स्वार हृदया हॉस्पिटल समोर आले असता पाठीमागून येणाऱ्या तवेरा गाडीने मोटर सायकल ला पाठीमागून जोराची धडक दिली धडक इतकी जोराची होती की मोटर सायकलवर पाठीमागे बसलेले महंमद धोडीबा खतिब हे आठ ते नऊ फूट उंचावर उडून कारच्या बोनेटवर आपटले आणि कारणे त्यांना तसेच फरपटत शंभर फूट पुढे घेऊन गेले. अपघात घडतात कारचालकाने कारसह पलायन केले घटनास्थळी दाखल झालेल्या शिराज बारगीर,आयुब पेंढारी,अफजल पठाण कार्यकर्त्यांनी या वाहनाचा पाठलाग करत हालोंडी गावच्या हद्दीतील टोल नाक्यावर अडवले.यावेळी चालक प्रमोद पाटील याने टॉमिने कार्यकर्त्यांना मारण्याचा प्रयत्न केला.महंमद खतीब यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने ते जागीच ठार झाले. तर मोटर सायकल स्वार राजाराम माने एक किरकोळ जखमी झाले.अपघात घडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी अपघातग्रस्त कार सह चालकाला ताब्यात घेतले असून या अपघाताची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे.

Spread the love
error: Content is protected !!