दत्तवाड / प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ प्राप्त व्हावे.यासाठी दरवर्षी सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन केले जाते. केंद्रस्तर, तालुकास्तर व जिल्हास्तर अशा पध्दतीने स्पर्धा घेण्यात येतात.दत्तवाड केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा कुमार विद्या मंदिर नवे दानवाडच्या प्रांगणात मंगळवार दि.१७ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न होत आहेत.समूहगीत,समुहनृत्य, नाटयीकरण, प्रश्नमंजुषा,कथाकथन ह्या स्पर्धा वरीष्ठ गट व कनिष्ठ गटात होणार आहेत.विजेत्या स्पर्धकांना आकर्षक शिल्ड व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.गट शिक्षण अधिकारी सौ.भारती कोळी,शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे,केंद्र प्रमुख संजय निकम,केंद्र समन्वयक सुभाष कुरुंदवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.सांस्कृतिक स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक मारुती कोळी, पुष्पा बाबर,विद्या सुतार,प्रतिभा मलकाने,कल्पना चौगुले, कल्लाप्पा पुजारी,शंकर पाटील,काशीनाथ मोडके यांचेसह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सूर्यकांत बेरड व सर्व सदस्य,ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत.