शिरोळ / प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब ऑफ शिरोळ आणि माधवबाग मल्टीडीसिप्लीनरी कार्डियाक क्लिनिक्स अँड हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्त तपासणी शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.रविवारी सकाळी शिरोळमधील अर्जुनवाड रस्त्यावरील रोटरी हॉल येथे रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. शरीरातील उत्तम प्रकृतीची माहिती देणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या रक्तातील विविध प्रकारच्या तपासण्या अल्पदरात करण्यात आल्या. सांगली येथील माधवबाग मल्टीडीसिप्लीनरी कार्डियाक क्लिनीक्स अँड हॉस्पिटल यांच्यावतीने रक्तातील जवळपास ७० विविध प्रकारच्या तपासणी करून आवश्यक सल्ला देण्यात आला.
या रक्त तपासणी शिबिराचा शुभारंभ रोटरी क्लब ऑफ शिरोळचे अध्यक्ष सुनील बागडी, सचिव डॉ. अंगराज माने, खजिनदार दिनेश माने गावडे, सदस्य पंडित काळे, बापूसाहेब गंगधर, अतुल टारे, अविनाश टारे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी परशुराम चव्हाण, अनिल बागडी,सुनील सन्नके,संजय माने,सुभाष नांदणीकर,श्रीकांत बागडी,मोहन बागडी, किरण बागडी, अक्षय माने, व्यंकाप्पा वडर, पायल माने, वैशाली माळी, राजश्री माळी, सीमा शितोळे, सुनंदा माने, विश्वास वडर, सुवर्णा माने यांच्यासह नागरिक उपस्थित होते.